एका षटकात ३० रन्स काढत पॅट कमिन्सनं केली नव्या विक्रमाची नोंद
क्रीडा

एका षटकात ३० रन्स काढत पॅट कमिन्सनं केली नव्या विक्रमाची नोंद

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सचा बुधवारच्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 18 रननं पराभव झाला. मात्र पॅट कमिन्सची फटकेबाजी सर्वांच्या लक्षात राहणार आहे. कमिन्सनं 34 बॉलमध्ये 3 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीनं 66 रनची नाबाद खेळी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोलकाताची अवस्था 6 आऊट 112 अशी होती त्यावेळी रसेल आऊट झाल्यानंतर कमिन्स बॅटींगला आला. रसेल परतल्यानं कोलकाताची इनिंग संथ होईल असा चेन्नईच्या बॉलर्सचा अंदाज होता. पण कमिन्सने सुरुवातीपासूनच चेन्नईच्या बॉलर्सची धुलाई सुरु केली. सॅम करननं टाकलेल्या 16 व्या ओव्हरमध्ये कमिन्सनं 1 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं तब्बल 30 रन काढले. कमिन्सनं एका ओव्हरमध्ये 4 सिक्स मारताच एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्स मारण्याचा विक्रम त्यानं आता दोनदा केला आहे. यापूर्वी त्यानं मागच्या सिझनमध्ये जसप्रीत बुमराहच्या एका ओव्हरमध्ये 4 सिक्स मारले होते. आयपीएलमध्ये ही कामगिरी दोनदा करणारा तो तिसरा खेळाडू बनला आहे. ख्रिस गेलनं सर्वाधिक 7 वेळा ही कामगिरी केली आहे. तर हार्दिक पांड्यानंही कमिन्सप्रमाणे दोनदा ही एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्स लगावले आहेत.

सामन्यात केकेआरचाही नवा विक्रम
कोलकातानंही या सामन्यात एका नव्या विक्रमाची नोंद केली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमनं ऑल आऊट झाल्यानंतरही 200 पेक्षा जास्त रन केले आहेत.