भारताला आणखी दोन मेडल! मरिअप्पन थंगवेलूनं जिंकलं पदक
क्रीडा

भारताला आणखी दोन मेडल! मरिअप्पन थंगवेलूनं जिंकलं पदक

टोक्यो : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताने आणखी दोन पदकाची कमाई केली आहे. मरिअप्पन थंगवेलूने उंच उडीत देशासाठी रौप्यपदक पटकावले. मंगळवारी अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या मरिअप्पनने पुरुषांच्या उंच उडी टी-६३ प्रकारामध्ये रौप्यपदक जिंकले. याच प्रकारात शरद कुमारने तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तामिळनाडूच्या मरिअप्पनने गेल्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या टी-४२ उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून सर्व देशवासीयांची मने जिंकली होती. यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्येही रूपेरी कामगिरी करत मरिअप्पनने सलग पॅरालिम्पिक पदक पटकावण्याचा विक्रम केला आहे. टोक्यो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतचा सर्वोत्तम खेळ दाखवून पदकतालिकेत दुहेरी अंक गाठला आहे. मरिअप्पन आणि शरद यांच्या पदकांमुळे भारताने उंच आपली पदकतालिका १० अशी केली आहे.

भारताने आतापर्यंत टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये एकूण दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली आहेत. जयपूर येथील १९ वर्षीय अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदकाचे लक्ष्य साधले. हरियाणाच्या सोनीपत येथील २३ वर्षीय सुमीत अंतिलने ६८.५५ मीटर लांब भाला सुवर्णपदक पटकावले. यासह त्याने एक नवीन विश्वविक्रम रचला आहे.