दिग्गज क्रिकेटपटूचंही वादग्रस्त विधान; म्हणाला, पुजाराचं डोकं फिरलंय आणि तो…
क्रीडा

दिग्गज क्रिकेटपटूचंही वादग्रस्त विधान; म्हणाला, पुजाराचं डोकं फिरलंय आणि तो…

लीड्स : लीड्स कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांवर आटोपला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वॉनने लीड्समधील भारतीय फलंदाजांच्या आणि विशेषतः चेतेश्वर पुजाराच्या विचारसरणीवर मोठे वक्तव्य केले आहे. लीड्समध्ये भारतीय संघाकडे बघून असे वाटते, की ते हा सामना जिंकण्यासाठी खेळत नाहीत, असे वॉनने म्हटले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मायकेल वॉनने खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या चेतेश्वर पुजारावर वादग्रस्त विधान केले आहे. तो म्हणाला, पुजारा लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात फक्त एक धावा करू शकला. तो म्हणाला, ”पुजाराचे डोके फिरले आहे आणि तो त्याचे तंत्र विसरला आहे. तो फक्त क्रीजवर उभे राहण्यासाठी खेळतो. अँडरसनने चांगला स्विंग केला आणि पुजारावरही दडपण होते. चेतेश्वर पुजारा गेल्या दोन वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. केवळ वॉनच नाही, इतर क्रिकेट तज्ज्ञही आता त्याला धारेवर धरत आहेत.

दरम्यान, वॉन पुढे म्हणाला, टेस्ट सीरिजमध्ये भारत १-०ने पुढे आहे. लीड्सनंतर आणखी दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. भारतीय संघाच्या मनात कुठेतरी, आम्हाला हा सामना नको आहे, असे वाटते. भारतीय संघ आता विजयानंतर हा सामना ड्रॉ करण्याचा विचार करत आहे.