IndvsAus : पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला अन् १३ वर्षांनी भारतीय संघावर ओढावली नामुष्की
क्रीडा

IndvsAus : पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला अन् १३ वर्षांनी भारतीय संघावर ओढावली नामुष्की

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी परतल्यामुळे तब्बल १३ वर्षांनी भारतीय संघावर परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये नामुष्की ओढावली आहे. याआधी २००७ साली चट्टोग्राम येथे झालेल्या बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात एकही धाव न करता एक विकेट गमावली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पहिल्या कसोटीसाठी शुबमन गिलला संधी नाकारत पृथ्वी शॉला संधी दिली. भारतीय संघाच्या निवडीवर चाहत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्यातच पहिल्याच कसोटीत खराब सुरुवात करत पृथ्वी शॉने आपल्या टीकाकारांना आयत कोलित हातात दिलं आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खराब सुरुवात केली. नाणेफेक जिंकत विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीसाठी मैदानात आलेला पृथ्वी शॉ मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.