IND vs ENG : प्रेक्षकांविना होणार पुढील तिन्ही टी-२० सामने
क्रीडा

IND vs ENG : प्रेक्षकांविना होणार पुढील तिन्ही टी-२० सामने

अहमदाबाद : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. याचा फटका भारत-इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेला बसला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले असून, तीन सामने होणार आहेत. मात्र, गुजरातमध्येही कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं चिंतेत भर घातली आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांसाठी गुजरात क्रिकेट असोसिएशनने यापुढील तिन्ही सामने प्रेक्षकांविना खेळविण्याचा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारत आणि इंग्लंड यांच्या सुरू असलेल्या टी-२० मालिकेला वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका बसला आहे. राज्यात दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्ण संख्येचं गांभीर्य लक्षात घेत गुजरात क्रिकेट मंडळाने भारत-इंग्लंड यांच्यातील उर्वरित टी-२० सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची टी-२० मालिका सुरू आहे. १६ मार्च, १८ मार्च आणि २० मार्च रोजी उर्वरित तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली होती. मात्र, पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढल्याने प्रेक्षकांविना सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रेक्षकांनी सामन्याची तिकीट घेतलेली आहेत. त्यांना पैसे परत करण्यात येतील, असं गुजरात क्रिकेट मंडळाने म्हटलं आहे.