मोठी बातमी : भारताची चिंता मिटली, रोहित फिट; मात्र ही आहे अडचण
क्रीडा

मोठी बातमी : भारताची चिंता मिटली, रोहित फिट; मात्र ही आहे अडचण

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी बातमी असून भारताचा महत्वाचा फलंदाज रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली आहे. रोहित शर्मा तंदुरुस्त झाल्यामुळे तो १३ तारखेला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. १४ दिवसांच्या विलगीकरणामुळे रोहित शर्मा पहिल्या दोन कसोटी मुकणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यापासून रोहित शर्मा उपलब्ध असणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑक्टोबर महिन्यात आयपीएलदरम्यान मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोहितला काही साखळी सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळेच रोहितची ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली नाही. आता जवळपास एक महिना तंदुरुस्तीवर लक्ष दिल्यावर एनसीएचे प्रमुख राहुल द्रविड, फिजिओ आणि निवड समिती सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहितची चाचणी झाली. ही फिटनेस चाचणी रोहित शर्मा पास झाला आहे.

१७ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतणार आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मावर आणि पुजारावर भारतीय संघाच्या फलंदाजी मदार असेल. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करणार आहे.