क्रीडा

जबरदस्त ! गुगलवर एकदा Indian Cricket Team असं टाइप करुन तर पाहा

नवी दिल्ली : ब्रिस्बेनमधील गाबा मैदानवर भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचे स्वागत आणि जल्लोष संपूर्ण भारतात तर झालाच पण, इतर देशातही या विजयाचे कौतुक झाले. आता या विजयाचा गुगलनेही व्हर्चुअल जल्लोष केला आहे. गुगलवर तुम्ही Indian Cricket Team किवां India national cricket team असं टाइप करुन सर्च करा. तुम्हाला व्हर्चुअल आतिशबाजी दिसेल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बॉर्डर-गावसकर मालिका भारतानं जिंकल्यानंतर गुगुलनं क्रीडा चाहत्यांना हे खास सरप्राइज दिलं आहे. ब्रिस्बेन येथील कसोटी सामना जिंकून भारतीय संघानं लागोपाठ तिसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर मालिकेवर वर्चस्व मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला असलेल्या गाबावर भारतीय संघानं तीन विकेटनं विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजाय प्रत्येक भारतीयानं साजरा केला. कोणी सोशल मीडियावर तर कोणी फटाके वाजवून. अनेकांनी फेसबुक आणि ट्विटवर आपल्या भावानांना वाट मोकळी करुन दिली. बुधवारी गुगलनेही ट्विट करुन India national cricket team सर्च करण्यास सांगून व्हर्चुअल आतिषबाजीची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.