Delhi Farmer Protest : …तर उपमुख्यमंत्री देणार राजीनामा
देश बातमी

Delhi Farmer Protest : …तर उपमुख्यमंत्री देणार राजीनामा

चंदीगढ : हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे राजीनामा देण्याच्या तयारीत असून भाजप सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चौटाला यांनी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये सुरू असलेल्या वादावर मौन सोडलं आहे. चौटाला यांनी माझ्यासाठी सदैव शेतकरी सर्वप्रथम आहे. जर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी एमएसपी मिळाली नाहीतर मी राजीनामा देणाऱ्यांमध्ये सर्वात पहिला असेल. यामुळे आता हरियाणामधील भाजप सरकार समोर नव्या अडचणी निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी अगोदरच हे स्पष्ट केले होते की, शेतकऱ्यांना एमएसपी निश्चित केली जावी. काल केंद्र सरकारद्वारे देण्यात आलेल्या लेखी प्रस्तावात एमएसपीचा समावेश होता. जोपर्यंत मी उपमुख्यमंत्री आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांचा एमएसपी निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील राहील, जर मी हे करू शकलो नाही तर मी राजीनामा देईल, असं चौटाला यांनी ट्विट केलं आहे.

उपमुख्यमंत्री चौटाला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, केंद्र सरकार किमान आधारभूत किंमत (एमएसपी) साठी शेतकऱ्यांना लिहून देण्यासाठी तयार आहे. शेतकरी संघटनांची सातत्याने सरकारशीच चर्चा सुरू आहे. अशावेळी लवकरच यावर तोडगा निघेल. तसेच, चौटाला यांनी हे देखील सांगितले की, जो पर्यंत ते सरकारमध्ये आहेत, तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) चा मुद्दा मांडत राहतील व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी एमएसपी मिळेल याची हमी घेतील.