सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा सुखी संसार मोडला, कारण आलं समोर
क्रीडा

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा सुखी संसार मोडला, कारण आलं समोर

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्जा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया – शोएब लवकरच तलाक घेणार आहेत. त्यांचा घटस्फोटोचा निर्णय झाला असून त्या दोघांच्या एका जवळच्या मित्रानेच ही माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या शोएब मलिक पाकिस्तानात आहे. एका स्पोर्ट्स चॅनेलसाठी तो टी-२० वर्ल्ड कपसंबंधित काम करत आहे. सानिया मिर्झा दुबईत आहे. सानियाने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. सानियाच्या पोस्टवरुनही ते दोघं एकमेकांपासून वेगळे होत असल्याची चर्चा होती. शुक्रवारी सानियाने आपला मुलगा इजहानसह एक फोटो शेअर केला होता. फोटोच्या कॅप्शनवरुन दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएब मलिक दुसऱ्या मुलीला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच सानिया आणि शोएब घटस्फोट घेत असल्याची माहिती आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

एका मीडिया रिपोर्टनुसार, शोएब मलिकच्या मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या एका सदस्याने या दोघांचा घटस्फोट झाल्याचं सांगितलं असल्याची माहिती आहे. या सदस्याने अधिकृतपणे सानिया आणि शोएबचा तलाक झाला असून दोघे वेगळे झाल्याचं सांगितलं.

१२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये पारंपरिकरित्या शोएब आणि सानिया विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या दहा वर्षांनंतर सानियाने मुलगा इजहानला जन्म दिला. सानिया आणि शोएबने नुकताच मुलाचा वाढदिवस साजरा केला. शोएबने हे फोटो सोशल मीडियावर शेअरही केले होते, पण सानियाने हे फोटो शेअर केले नव्हते. त्यावरुनही दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा होती.