टी-२० विश्वचषक २०२२ : इंग्लंडने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
क्रीडा

टी-२० विश्वचषक २०२२ : इंग्लंडने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारत विरुद्ध इंग्लंड या उपांत्य फेरीचा टॉस इंग्लंड संघाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

खेळपट्टी आणि हवामान
खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे आणि स्क्वायरमधील लहान चौकार फलंदाजांना मोठे फटके मारण्यास प्रोत्साहित करतात. खेळपट्टीमुळे फिरकीपटूंना मदत होईल अशी अपेक्षा आहे. आकाशात हलके ढग असतील पण पावसाची शक्यता नाही आणि पूर्ण २०-२० षटकांचा सामना अपेक्षित आहे.

इतिहास भारताच्या बाजूने नाही
मर्यादित षटकांच्या लढतीत भारतीय संघाने नऊ वर्षांत एकही विजेतेपद जिंकलेले नाही. ही कटू मालिका संपविण्याची संधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आहे. भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडक उंचावला होता. मात्र, इतिहास पूर्ण भारताच्या बाजूने नाही. भारताने गेल्या पाच वर्षांत आयसीसीच्या स्पर्धेतील उपांत्य लढत जिंकलेली नाही. यापूर्वीचे यश २०१७ च्या स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धचे होते. आजचे प्रतिस्पर्धी इंग्लंड नक्कीच बांगलादेशपेक्षा जास्त ताकदवान आहेत.

खेळपट्टीचा अंदाज
प्रामुख्याने ढगाळ हवामान असेल. सकाळी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली, संध्याकाळी पावसाची शक्यता नाही. दुपारपासून वाऱ्याचा वेग ताशी २५ किलोमीटरपर्यंत असेल. येथील कमीतकमी तपमान १७ अंश असेल. या मैदानाची खेळपट्टी प्रामुख्याने फलंदाजीला अनुकूल आहे. मात्र, या मैदानावर स्पर्धेतील सहा सामने झाले. त्यामुळे चेंडू कमी वेगाने येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या स्पर्धेत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला अॅडलेडमध्ये हार पत्करावी लागली आहे. पाऊस झालाच, तर लढतीसाठी राखीव दिवस आहे.