दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द; तिसऱ्या दिवसासाठी पंचानी घेतला हा निर्णय
क्रीडा

दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द; तिसऱ्या दिवसासाठी पंचानी घेतला हा निर्णय

ब्रिस्बेन : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात पावसानेच बॅटिंग केली. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पंच आणि सामनाधिकाऱ्यानं आजच्या दिवसाचा खेळ थांबवला आहे. उद्या, तिसऱ्या दिवसाच्या खेळाला अर्धा तास लवकर सुरुवात करण्याचा निर्णय पंचानी घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसऱ्या दिवासाखेर भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदल्यात ६२ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप ३०७ धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या जोडीनं मैदानावर तग धरला आहे. पुजारा ८ तर रहाणे २ धावांवर खेळत आहे.

दरम्यान, भारतीय संघाच्या युवा गोलंदाजांनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला ३६९ धावांवर रोखलं. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेन यानं १०८ तर कर्णधार टिम पेन यानं ५० धावांची महत्वपूर्ण खेळी केली. भारतीय संघाकडून नटराजन, सुंदर आणि शार्दुल यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तर मोहम्मद सिरजला एक विकेट मिळाली.