धवनने मोडला एम एस धोनीचा रेकॉर्ड; झेप तिसऱ्या स्थानावर
क्रीडा

धवनने मोडला एम एस धोनीचा रेकॉर्ड; झेप तिसऱ्या स्थानावर

सिडनी : टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये 36 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली. शिखरने के एल राहुलसोबत सलामीला ५६ धावांची भागिदारी केली त्यानंतर विराटसोबत त्याने ३९ रन केले. या इनिंगमध्ये केलेल्या ५२ धावांच्या जोरावर शिखर धवनने एमएस धोनीला मागे टाकलं आहे. शिखर धवन आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या या यादीत धवन २४ व्या क्रमांकावर गेला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

धवनने 63 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये 1,641 धावा केल्या आहेत. तर यावर्षी ऑगस्ट महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीने 98 टी-20 मॅचमध्ये 1617 धावा केल्या होत्या. दुसऱ्या मॅचआधी धवन धोनीपासून 29 रन मागे होता. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट पहिल्या आणि रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने 84 टी-20 मॅचमध्ये 2843 रन केले आहेत, तर रोहितने 108 टी-20 मॅचमध्ये 2773 रन केले आहेत. यानंतर मार्टिन गप्टीलने 91 मॅचमध्ये 2575 रन केले.

या यादीमध्ये पाकिस्तानचा शोएब मलिक चौथ्या क्रमांकावर आहे. मलिकने 116 टी-20 मॅचमध्ये 2335 रन केले. पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन आहे. मॉर्गनने 97 मॅचमध्ये 2,278 रन केले आहेत. याआधी कॅनबेरामध्ये झालेल्या पहिल्या टी-20मध्ये शिखर धवन फक्त एक रन करून आऊट झाला होता. टीम इंडियाचा गब्बर म्हणून ओळख असलेल्या धवनने 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. टी-20 टीममधून त्याला अनेकवेळा बाहेर ठेवण्यात आलं. 2014 आणि 2016 सालच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये धवन टीममध्ये नव्हता. पण आयपीएलच्या 13 व्या मोसमात धवनने खोऱ्याने रन काढल्या.