शोएब अख्तरला पराभवाची घाई झालीय फार; आधी इंग्लंडची खिल्ली उडवली आणि मग भारताला…
क्रीडा

शोएब अख्तरला पराभवाची घाई झालीय फार; आधी इंग्लंडची खिल्ली उडवली आणि मग भारताला…

ॲडलेड: टी-२० विश्वचषक २०२२ ची रंगत आता अधिकच वाढली आहे. आपल्या नशिबाच्या जोरावर उपांत्य फेरीत दाखल झालेल्या पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज भारताचा उपांत्य फेरीतील सामना इंग्लंडविरुद्ध आहे आणि हा सामना भारताने जिंकल्यास अंतिम फेरीत हायव्होल्टेज लढत कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये पाहण्याची सर्वांची इच्छा पूर्ण होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोणत्याही मैदानावर आणि कोणत्याही खेळात भारत-पाकिस्तान आमनेसामने आले, तर दोन्ही देशांतील लोकांचा जल्लोष शिगेला पोहोचतो. मग क्रिकेटच्या मैदानावर दोघांची टक्कर झाली तर चाहत्यांशिवाय खेळाडूही एकमेकांच्या टीमला साथ देतात. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर देखील अशाच खेळाडूंमध्ये सामील आहे जे चाहत्यांसह टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये दोघांमधील सामन्याची वाट पाहत आहेत. अख्तरनेही आपल्या एका व्हिडिओमध्ये हे व्यक्त केले आहे.

पाकिस्ताननची अंतिम फेरीत धडक

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम पाकिस्तानने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सिडनी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव केला. एकेकाळी पाकिस्तानचा संघ विश्वचषकातून बाहेर पडताना दिसत होता आणि त्यानंतर अनेक दिग्गजांनी पाकिस्तानी खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यात अख्तरचाही सहभाग होता पण आता तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी उत्सुक झाला आहे. भारताविरुद्ध दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडचे कडवे आव्हान असेल.

अख्तरने व्हिडिओ शेअर केला

सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानच्या विजयानंतर शोएब अख्तरने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने आपल्या संघाचे अभिनंदन केले आणि टीम इंडियाने आता अंतिम फेरी गाठली पाहिजे असेही सांगितले. अख्तर म्हणाला, ‘हिंदुस्थान, आम्ही मेलबर्नला पोहोचलो आहोत. आम्ही तुमची वाट पाहत आहोत. तुम्ही या आणि आमच्यासोबत फायनल खेळा. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आम्ही मेलबर्नमध्येच इंग्लंडवर मात केली होती, ते १९९२ मध्ये आणि आता २०२२ आहे. तुम्ही या, मला तुम्ही मेलबर्नला यावे असे वाटते.