गांगुलीला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
क्रीडा

गांगुलीला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

कोलकाता : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गांगुलीला छातीत दुखत असल्यानं बुधवारी कोलकातामधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या तपासणीनंतर रविवारी सकाळी त्याला डिस्चार्ज दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अपोलो रुग्णालयात गांगुलीवर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत, शरीराचे सर्व व्हायटल पॅरामीटर्स स्थिर असल्याची माहिती अपोलो हॉस्पिटलने दिली आहे. शनिवारी संध्याकाळी डॉ. अफताब खान यांनी गांगुलीच्या प्रकृतीची तपासणी केली होती. यापूर्वी गांगुलीला 2 जानेवारी रोजी छातीत दुखल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. कोलकात्याच्या वुडलॅन्ड रुग्णालयात सौरव गांगुलीवर उपचार करण्यात आले होते. तर त्यावेळी गांगुलीला सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर आता त्यांच्यावर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी करण्यात आली आहे. सौरव गांगुलीच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाल्या होत्या.

अपोलो रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार डॉ. सप्तर्षी बसू आणि डॉ. सुरज मंडल हे गांगुलीवर सध्या उपचार करत होते. गांगुलीच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यासाठी अपोलो हॉस्पिटलनं चार सदस्यीय मेडिकल बोर्डाची स्थापना करण्यात केली होती. गांगुली सध्या सध्या हृदयविकाराच्या आजारानं ग्रस्त आहे.