विराट कोहली मोडणार कसोटीतील धोनी-पॉण्टिंगचे हे विक्रम!
क्रीडा

विराट कोहली मोडणार कसोटीतील धोनी-पॉण्टिंगचे हे विक्रम!

चेन्नई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगचा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. मागच्यावर्षी शतक करण्यात अपयशी ठरलेला विराट यावर्षी पुन्हा एकदा जोरदार कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने भारतात 21 टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर विराटच्या नेतृत्वात भारताने मायभूमीत 20 टेस्ट जिंकल्या आहेत. या सीरिजमध्ये आणखी दोन विजय मिळवत कोहली धोनीचा विक्रम मोडेल. धोनीच्या नेतृत्वात भारातने 60 पैकी 27 मॅच जिंकल्या, तर विराट कर्णधार असताना भारताला 56 पैकी 33 मॅच जिंकता आल्या. विराट कोहली भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याशिवाय पहिल्या टेस्टमध्ये 14 रन करताच विराट वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांनाही मागे टाकेल. कर्णधार म्हणून विराटने 61च्या सरासरीने 5,220 रन केले आहेत. विराटच्या पुढे सध्या ग्रॅम स्मिथ (8,659), एलन बॉर्डर (6,623), रिकी पॉण्टिंग (6,542) आणि क्लाइव्ह लॉईड (5333) आहेत. या दौऱ्यात विराटने शतक केलं तर तो कर्णधार असताना सर्वाधिक शतक करण्याचा पॉण्टिंगचा विक्रम मोडेल. कर्णधार असताना विराट आणि पॉण्टिंगच्या नावावर 41-41 आंतरराष्ट्रीय शतकं आहेत. कोहलीने ही शतकं 188मॅचमध्ये नेतृत्व करून केली आहेत, तर पॉण्टिंगला एवढी शतकं करायला 324सामने लागले आहेत. इंग्लंडविरुद्ध एक शतक केलं तर तो पॉण्टिंगच्या पुढे निघून जाईल.

याशिवाय कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतकं आहेत. विराटच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर (100) आणि रिकी पॉण्टिंग (71) आहेत. इंग्लंडविरुद्धच्या चार टेस्ट, पाच टी-20 आणि तीन वनडेमध्ये दोन शतकं करून विराट सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जाईल.