दक्षिण आफ्रिकेकडून भारतीय महिला संघाचा पराभव
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेकडून भारतीय महिला संघाचा पराभव

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा आठ गडी राखून पराभव झाला आहे. जवळपास वर्षभरानंतर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या महिला क्रिकेट संघाला रविवारी पराभव पत्करावा लागला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वेगवान गोलंदाज शबनिम इस्माइलने (३/२८) केलेल्या प्रभावी गोलंदाजीनंतर लिझेल ली (नाबाद ८३ धावा) आणि लौरा वॉल्वर्ड (८०) यांच्या अर्धशतकांमुळे आफ्रिकेला विजय साकारता आला. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मिताली राज (५०) आणि हरमनप्रीत कौर (४०) यांनी चौथ्या गड्यासाठी रचलेल्या ६२ धावांच्या भागीदारीमुळे भारताने ५० षटकांत किमान ९ बाद १७७ धावा केल्या.
अनुभवी सलामीवीर स्मृती मानधना (१४), पूनम राऊत (१०), जेमिमा रॉड्रिग्ज (१) यांनी सपशेल निराशा केली. प्रत्युत्तरात आफ्रिकेच्या सलामीवीरांनी १६९ धावांची सलामी दिली आणि ४०.१ षटकांतच सामना संपवण्यात मोलाची भूमिका बजावली.

संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ९ बाद १७७ (मिताली राज ५०, हरमनप्रीत कौर ४०; शबनिम इस्माइल ३/२८) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : ४०.१ षटकांत २ बाद १७८ (लिझेल ली नाबाद ८३, लौरा वॉल्वर्ड ८०; झुलन गोस्वामी २/३८)