Tokyo Paralympics : भारताला आणखी एक पदक; तिरंदाज हरविंदरची कमाल
क्रीडा

Tokyo Paralympics : भारताला आणखी एक पदक; तिरंदाज हरविंदरची कमाल

टोक्यो : पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी करत आणखी एका पदकाची कमाई केली आहे. तिरंदाज हरविंदर सिंगने कोरियाच्या सू मिन किमचा पराभव करत कांस्यपदक जिंकले. त्याने हा सामना ६-५ ने जिंकला. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने प्रथमच तिरंदाजीमध्ये पदक पटकावले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत १३ पदके जिंकली आहेत. भारताकडे आता २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्यपदके आहेत. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. रिओ पॅरालिम्पिक (२०१६) मध्ये भारताने २ सुवर्णांसह ४ पदके जिंकली होती.

यापुर्वी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरा हिनं इतिहास रचत वैयक्तिक दुसरं पदक पटकावलं आहे. एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकत तिने इतिहास रचला आहे. महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच१ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवलं. अंतिम फेरीत ४४५.९ गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर राहिली.