पण… ब्रिस्बेनच्या विजयानंतर अजिंक्य रहाणेचा केक कापण्यास नकार; कारण…
क्रीडा

पण… ब्रिस्बेनच्या विजयानंतर अजिंक्य रहाणेचा केक कापण्यास नकार; कारण…

मुंबई : ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं तीन गड्यांनी कांगारुंचा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिका २-१ नं जिंकली. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर मायदेशी परलेल्या भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य राहणेचं जल्लोषात स्वागत झालं. या जल्लोषा दरम्यान झालेल्या एक क्षण मात्र अविस्मरणीय ठरला. या क्षणामुळे अजिंक्याने पुन्हा एकदा भारतीयांचीच नव्हे तर ऑस्ट्रेलियन नागरिकांचीही मने जिंकली आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याच झालं असं की, ‘आला रे आला, अजिंक्य आला…’ या घोषणांसह अजिंक्य रहाणेचे गुरुवारी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. कर्णधार अजिंक्य रहाणेचे माटुंहा येथील राहत्या घरी आधिक जल्लोषात तसेच पारंपारक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात स्वागत झाले. अजिंक्यच्या स्वगातासाठी त्याच्या सोसायटीमधील रहिवाश्यांनी केक कटिंगचं आयोजन केलं होतं. कांगारुंचा पराभव केल्याने केकवर कांगारुची प्रतिकृती साकारण्यात आली. अजिंक्यला स्वागतानंतर हा केक कापण्याची विनंती करण्यात आली.

मात्र, अजिंक्याने हा केक कापण्यास नकार दिला. कांगारु ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. यामुळे अजिंक्यने कांगारुची प्रतीकृती असणारा केक कापण्यास नकार देत आपल्यातील खिलाडूवृत्ती दाखवून दिली. या कृतीमुळे रहाणेचं पुन्हा एकदा कौतुक केलं गेलं.त्याच्या या कृतीनंतर सर्वांची मन जिंकली आहेत. काहींनी तर अजिंक्यचं कौतुक करताना ‘एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे’ असं म्हटलं आहे.

दरम्यान, ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं तीन गड्यांनी कांगारुंचा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिका २-१ नं जिंकली. या विजयानंतर अजिंक्यसह रहाणेसह रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर आणि रवी शास्त्री यांदेची गुरुवारी मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आले. विशेषत: प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थइतीत आणि पहिल्या कसोटीतील दारुण पराभवानंतरही भारताने मालिका जिंकण्याचा पराक्रम केल्यामुळे रहाणेसह विजयीवीरांवर चोहोबाजूनं कौतुकाचा वर्षाव होत आहे.