युरो कपमध्ये या आठ संघांची उपांत्यपूर्व फेरीत धडक
क्रीडा

युरो कपमध्ये या आठ संघांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

नवी दिल्ली : यूरो कप २०२० स्पर्धेची रंगत शेवटच्या टप्प्यात आली असून साखळी आणि बाद फेरीनंतर आता उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांची मेजवानी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. स्वित्झर्लंड, स्पेन, बेल्जियम, इटली, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, युक्रेन आणि इंग्लंड या ८ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

असे रंगतील सामने
१) उपांत्यपूर्व फेरीत पहिला सामना स्वित्झर्लंड आणि स्पेन यांच्यात रंगणार आहे. यूरोपियन चॅम्पियनशिपमध्ये स्वित्झर्लंड आणि स्पेन पहिल्यांदाच भिडणार आहे. यापूर्वी स्पेन आणि स्वित्झर्लंड संघ यापूर्वी १९६६, १९९४ आणि २०१० विश्वचषक स्पर्धेत आमनेसामने आले होते. १९६६ आणि १९९४ साली स्पेनने स्वित्झर्लंडवर विजय मिळवला होता. तर २०१० साली स्वित्झर्लंडने स्पेनवर विजय मिळवला होता. मोठ्या स्पर्धेत स्वित्झर्लंड चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.

२) बेल्जियम आणि इटली पाचव्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यापूर्वीच्या चार सामन्यापैकी ३ सामन्यात इटलीने विजय मिळवला आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. या स्पर्धेमध्ये १९५४ विश्वचषक, यूरोपियन चॅम्पियनशिप १९८०-२०००-२०१६ या स्पर्धांचा समावेश आहे.

३) यूरोपियन चॅम्पियनशिपमध्ये चेक रिपब्लिक आणि डेन्मार्क तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मागच्या दोन्ही सामन्यात चेक रिपब्लिकने डेन्मार्कवर विजय मिळवला आहे. यूरो कप २००० स्पर्धेतील साखळी सामन्यात, तर २००४ यूरो कप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत नमवत उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे आता या सामन्यात कोण विजय मिळवणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

४) उपांत्यपूर्व फेरीत युक्रेन विरुद्ध इंग्लंड सामना रंगणार आहे. मागच्या सात सामन्यात इंग्लंड युक्रेनवर वरचढ असल्याचं दिसून आलं आहे. ७ पैकी ६ सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे.