मैदानातच राडा ! विराट आणि अंपायरचा वाद; व्हिडिओ पाहाच
क्रीडा

मैदानातच राडा ! विराट आणि अंपायरचा वाद; व्हिडिओ पाहाच

सिडनी : तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव झाला. यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. मात्र ११व्या षटकात मैदानातच एक राडा झाला. मॅथ्यू वेडला नटराजन गोलंदाजी करत असताना नटराजने टाकलेला चेंडू वेडला टोलवता आला नाही. चेंडू वेडच्या पायाला लागल्यानंतर नटराजन आणि यष्टीरक्षक राहुलने अपील केलं पण पंचांनी मात्र त्याला नाबाद ठरवलं आणि यावेळी एक वेगळीच घटना घडली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंचांच्या निर्णयावर तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यासाठी डीआरएस रिव्ह्यू घेण्याची सुविधा टीम इंडियाकडे उपलब्ध होती. विराट कोहली सीमारेषेवर फिल्डींग करत होता. त्याने धावत येऊन पंचांकडे डीआरएसची मागणी केली. त्याची मागणी आधी मान्य करण्यात आली पण नंतर मात्र ती मागणी फेटाळण्यात आली. याचं कारण अतिशय विचित्र असल्याचं निष्पन्न झालं.

https://twitter.com/sandybatsman/status/1336242509027000320

भारताने डीआरएस रिव्ह्यू मागितला त्याआधीच मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर त्या शॉटचा रिप्ले दाखवण्यात आला होता. त्यामुळे विराटला डीआरएसचा रिव्ह्यू नाकारण्यात आला. रिप्लेमध्ये वेड पायचीत बाद असल्याचं स्पष्ट दिसत होतं. पण, स्क्रीनवर दाखवल्यामुळे रिव्ह्यू घेतल्याचं मानत पंचांनी डीआरएसचा निर्णय फेटाळून लावला.