भारताकडून पराभव झाल्यावर इंग्लंडला अजून एक मोठा धक्का, दिग्गज खेळाडूची निवृत्ती जाहीर
क्रीडा

भारताकडून पराभव झाल्यावर इंग्लंडला अजून एक मोठा धक्का, दिग्गज खेळाडूची निवृत्ती जाहीर

लंडन : इंग्लंडला भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात पराबव पत्करावा लागला, त्याचबरोबर त्यांना मालिकाही गमवावी लागली. पण यानंतर इंग्लंडच्या संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. कारण इंग्लंडच्या संघातील एका दिग्गज खेळाडूने आता वनडे क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय सामना आपल्या कारकिर्दीतील शेवटचा असेल. स्टोक्सने लॉर्ड्सवरील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ८४ धावांची मोलाची खेळी साकारून इंग्लंडला विश्वचषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. सध्याच्या घडीला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळणे आपल्याला जमणार नसल्याचे स्टोक्सने सांगितले आहे.

स्टोक्सने आतापर्यंत १०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने २९१९ धावा केल्या आहेत. नुकतीच त्याची इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. बेन स्टोक्सने जो रूट याच्याकडून पदभार स्वीकारला. कसोटी कर्णधार म्हणून त्याचा प्रवास अविस्मरणीय ठरला होता. कारण स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध २-० अशी मालिका जिंकली होती. त्यानंतर पुन्हा एकमेव कसोटीत स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने भारतावर दमदार विजय मिळवला. इंग्लंडच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या, भारताविरुद्ध नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेत स्टोक्सने ०, २१ आणि २७ अशा धावा केल्या होत्या.