विराट कोहलीसमोरील अडचणी वाढल्या! न्यायालयाने बजावली नोटीस
क्रीडा

विराट कोहलीसमोरील अडचणी वाढल्या! न्यायालयाने बजावली नोटीस

नवी दिल्ली : केरळ उच्च न्यायालयानं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला नोटीस बजावली आहे. त्यामुळे विराट कोहलीसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. विराटसोबतच प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता अजू वर्गीस यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विराट कोहली ऑनलाईन रमी गेम्सचा सदिच्छादूत आहे. याचविरोधात केरळ उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या ऑनलाईन गेमवर प्रतिबंध लावण्याची मागणी याचिकेत केली गेली आहे. याचिककर्त्यानं पुढं म्हटलं, की कोहलीचा चाहता वर्ग अशा जाहिरातींमुळे या गेम्सकडे आकर्षित होता. अशा गेममुळे अनेकांनी आपले पैसे गामवले आहेत आणि पुढे आत्महत्येपर्यंतचं टोकाचं पाऊलही उचललं आहे. त्यामुळे, यावर प्रतिबंध आणणं गरजेचं आहे.

27वर्षाच्या विनीतनं काही दिवसांपूर्वीच तिरुवनंतपुरमच्या कुट्टीचलमध्ये आत्महत्या केली होती, कारण त्याचं 21 लाखाचं नुकसान झालं होतं. साजेश नावाच्या व्यक्तीलादेखील या गेममुळे खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. पुढे याचिककर्ता म्हणाला, की उच्च न्यायालयाने या गोष्टीत हस्तक्षेप नक्की करावा, कारण अनेक लोकांना यातून मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. मीदेखील 6 लाखापेक्षा जास्त रुपये घालवून बसलो आहे. याच प्रकरणामुळे या तिघांनाही न्यायालयाने नोटीस बजावली आहे.