पाकिस्तानी खेळाडूंना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिला थेट इशारा; काय आहे प्रकरण?
क्रीडा

पाकिस्तानी खेळाडूंना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिला थेट इशारा; काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंना न्यूझीलंड बोर्डाने दिला थेट इशारा आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघातील खेळाडूंना अखेरची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी न्यूझलंडमधील बायो सेक्युअर बबलचे नियम मोडले होते. ज्यानंतर संघातील सात खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. पाकिस्तानी खेळाडूंच्या या वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने, आता नियम मोडाल तर पूर्ण संघाला परत पाठवू अशी थेट वॉर्निंग दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पीसीबीचे सीईओ वासिम खान यांच्याशी संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितल्याप्रमाणे आपल्याकडून ३-४ वेळा नियमांचा भंग झाला. त्यांनी आपल्याला शेवटची वॉर्निंग दिली आहे. मला कल्पना आहे की तुम्हा सर्वांसाठी हा काळ खडतर आहे. फक्त १४ दिवस धीर ठेवा आणि यानंतर तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जाऊ शकता. खोलीच्या बाहेर जाऊ शकता. पण यानंतर एकदाही आपल्याकडून नियमांचा भंग झाला तर ते आपल्याला घरी पाठवतील. असं झाल्यास आपल्यासाठी हे अतिशय लज्जास्पद असेल. सीईओ वासिम खान यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातलं वृत्त ईएसपीएनक्रिकइन्फो ने दिलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. १८ डिसेंबरपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेला सुरुवात होणार असून, २६ डिसेंबरपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल.