कायद्यांचे नाव कृषी कायदे; पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
राजकारण

कायद्यांचे नाव कृषी कायदे; पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे मागे घायावेत आणि शेती मालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी दिल्लीत सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. अशातच केंद्रसरकारने दिलेला चर्चेचा प्रस्तावही शेतकऱ्यांनी धुडकावून लावत हायवेवरच चर्चा करण्याची मागणी केली आहे. या परीस्थितीवर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हल्लाबोल केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रियांका गांधी यांनी ट्विटमधून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ”कायद्यांचे नाव कृषी कायदे ठेवण्यात आले आहे, पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा. कृषी कायदे शेतकऱ्यांना न विचारता कसे केले जातात. यात शेतकऱ्यांच्या हिताकडे कसे दुर्लक्ष केले जाऊ शकते? असे प्रश्न प्रियांका गांधी यांनी विचारले आहे. तसेच, आपण सर्वजण मिळून शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी आवाज उठवू, असं आवाहन प्रियांका गांधींनी केलं आहे.

तसेच, काँग्रेसने स्पीक अप इंडिया अभियानांतर्गत शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी #Speakupforfarmers अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रियांका गांधींनी यापूर्वी देखील पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन केंद्र सरकारवर टीका केली होती. ज्यावेळी भाजपचे अब्जाधीश उद्योगपती मित्र दिल्लीत येतात त्यावेळी त्यांना रेड कार्पेट टाकले जाते. मात्र, ज्यावेळी शेतकरी दिल्लीकडे येण्यासाठी निघतात त्यावेळी रस्ते खोदले जातात, असं टीकास्त्र प्रियांका गांधींनी केंद्रावर सोडलं होते.