चेन्नईचा सलग तिसरा विजय; रसेल, कमिन्सच्या फटकेबाजीनंतरही कोलकात्याचा पराभव
क्रीडा

चेन्नईचा सलग तिसरा विजय; रसेल, कमिन्सच्या फटकेबाजीनंतरही कोलकात्याचा पराभव

मुंबई : आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स यांच्या आक्रमक अर्धशतकानंतरही कोलकाता नाईट रायडर्सचा १८ रन्सनी पराभव झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 बाद 220 अशी मोठी मजल मारली. २२१ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याची अवस्था 5 बाद 31 अशी बिकट झाली होती. त्यानंतर रसेल, कमिन्स आणि दिनेश कार्तिक यांनी फटकेबाजी करत जोरदार प्रतिकार केला. त्यांचा हा प्रयत्न अखेर कमी पडला आणि कोलकात्याला स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आंद्रे रसेलनं केवळ 22 चेंडूत 54 रन काढले. रसेलला दिनेश कार्तिकनं 40 रन काढत भक्कम साथ दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर चेन्नई आरामात जिंकेल असं वाटत होतं. त्याचवेळी पॅट कमिन्सनं जोरदार फटकेबाजी केली. कमिन्सनं सॅम करनच्या एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीनं 30 रन काढले. कमिन्सनं 33 बॉलमध्ये नाबाद 65 रन काढले. वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा हे केकेआरचे शेवटचे दोन बॅट्समन कमिन्सला स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नात रन आऊट झाले आणि केकेआरचा पराभव झाला.

तत्पूर्वी, चेन्नईकडून फाफ ड्यू प्लेसिसनं सर्वात जास्त नाबाद 95 रन काढले. 60 बॉलमध्ये 9 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं त्यानं ही खेळी केली. ऋतुराज गायकवाड याने आक्रमक 64 रन करत सीएसकेला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानं 33 बॉलमध्येच 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं या सिझनमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. तो अखेर 42 बॉलमध्ये 64 रन काढून आऊट झाला. चौथ्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या महेंद्रसिंह धोनीनं 8 बॉलमध्ये 17 रन काढले. तर रवींद्र जडेजा 6 रन काढून नाबाद राहिला.