जेम्स अँडरसन मोडणार सचिनचा विश्वविक्रम
क्रीडा

जेम्स अँडरसन मोडणार सचिनचा विश्वविक्रम

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ ३ जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ टेस्ट मॅचची मालिका खेळणार आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात फास्ट बॉलर जेम्स अंडरसन सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडू शकतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अँडरसनने 160 टेस्ट मॅचमध्ये त्याने 614 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडची टीम या मोसमात घरच्या मैदानात एकूण 7 टेस्ट खेळणार आहे. यातल्या दोन टेस्ट न्यूझीलंडविरुद्ध आणि 5 भारताविरुद्ध आहेत. अँडरसन जर या सगळ्या टेस्ट खेळला तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल. सचिन तेंडुलकर त्याच्या करियरमध्ये 200 टेस्ट खेळला, यापैकी 94 मॅच त्याने घरच्या मैदानात म्हणजेच भारतात खेळल्या. घरच्या मैदानात एवढ्या टेस्ट खेळण्याचा हा विश्वविक्रम आहे. जेम्स अँडरसनने इंग्लंडमध्ये 89 टेस्ट खेळल्या आहेत. या मोसमात त्याने जर 7 टेस्ट खेळल्या तर त्याच्या नावावर इंग्लंडमध्ये 96 टेस्ट होतील. ज्यामुळे तो घरच्या मैदानात सर्वाधिक टेस्ट खेळणारा क्रिकेटपटू बनणार आहे.

इंग्लंडकडून सर्वाधिक टेस्ट खेळण्याचं रेकॉर्ड एलिस्टर कूकच्या नावावर आहे. कूकने इंग्लंडसाठी 161 टेस्ट खेळल्या. सर्वाधिक टेस्ट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत शिवनारायण चंद्रपॉल राहुल द्रविड (164) आणि जॅक कॅलिस (166) यांनाही अंडरसन मागे टाकू शकतो.