राजकारण

अखेर मनसेच्या इंजिनाला जोडला भाजपचा डबा; युतीची घोषणा

पालघर : भाजप आणि मनसेची युती होणार का? अशी चर्चांना वेग आलेला असतानाच अखेर मनसेचं इंजिन भाजपच्या डब्याला जोडलं गेलं आहे. पालघरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची पोटनिवडणूक होत आहे, या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे लांबलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा कार्यक्रम ठरला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी […]

राजकारण

बाळा नांदगांवकर यांना अटक; मनसे आक्रमक

मुंबई : कोरोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी मंगळवारी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे मनसेने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काळाचौकी परिसरात कार्यकर्त्यांसोबत दहीडंडी […]

राजकारण

राज ठाकरेंचे शरद पवारांना दमदार प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींचं राजकारण वाढला असा आरोप केला होता. त्यानंतर शरद पवारांनी राज ठाकरेंना आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचण्याचा खोचक सल्ला दिला होता. त्या मुद्द्यावरून आता राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देखील देत पवारांच्या राजकारणावर […]

बातमी महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर राज ठाकरे कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेतलं होतं. राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. त्यानंतर कोरोना परिस्थितीची जाणीव करून देत सरकारला घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर राज यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. राज्यात कोरोनानं थैमान […]

देश बातमी

मनसे नेत्याच्या मारेकऱ्याला लखनौमधून अटक

मुंबई : मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि आरटीआय कार्यकर्ता जमील अहमद शेख याच्या हत्या प्रकरणात आरोपी इरफान सोनू शेख मंसूरी उर्फ राजधनिया याला शनिवारी लखनऊ येथून उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष दलाने (STF) अटक केली आहे. जमील अहमद शेख यांची हत्या ठाणे जिल्ह्यात 23 नोव्हेंबर 2020 मध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली होती. एसटीएफच्या एका […]

राजकारण

ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा; राज ठाकरेंचा राज्यसरकारवर निशाणा

मुंबई : ”राज्याच्या गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे, त्यामुळं सरकारनं तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद […]

राजकारण

मनसे नेत्याचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल; स्वतःच अपयश झाकण्यासाठी…

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्त्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही भागात लॉकडाऊन तर काही भागात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी यांनी ठाकरे सरकारवर प्रश्नांची सर्वत्ती करत निशाणा साधला आहे. फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्वीटच्या […]

राजकारण

राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद; पराभव पचवूनही गेली १५ वर्षे साथ देणाऱ्या…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वर्धापन दिन आज साजरा होत आहे. दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्कवर होणारा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. असं असलं तरी राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केलं. अनेक पराभव पचवूनही गेली १५ वर्षे साथ देणाऱ्या मनसैनिकांचे […]

राजकारण

राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला फटकारले; मंत्री गर्दी करून धुडगूस घालतायेत आणि…

मुंबई : “मंत्री गर्दी करून धुडगूस घालतायेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला सरकार नकार देते. कोरोनाचं संकट येतंय असं वाटत असेल, तर निवडणुकाही पुढे ढकलाव्यात,” अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. मराठी भाषा दिनानिमित्त मनसेच्या वतीने मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मनसेच्या […]

राजकारण

त्यावेळी कोरोना पसरत नाही का? मनसे नेत्याचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातीन अनेक भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून काही निर्बंध लादले आहेत. यामध्ये सभा घेणे, रॅली काढणे, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे याला बंदी घातली आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोना कालावधीत मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती झाली आहे. ही औषधे सध्या विकली जात नाहीत […]