ऐतिहासिक विजयाने कोहलीच्या नावावर विराट विक्रमाची नोंद
क्रीडा

ऐतिहासिक विजयाने कोहलीच्या नावावर विराट विक्रमाची नोंद

लॉर्ड्स : दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय संघाने कसोटीत इंग्लंडला पराभूत करण्याची ही तिसरीच वेळ आहे. महेंद्रसिंह धोनीच्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१४ मध्ये लॉर्ड्सवर शेवटच्या वेळी ९५ धावांनी विजय मिळवला होता. यापूर्वी भारताने १९८६मध्ये लॉर्ड्सवर प्रथमच विजय मिळवला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्सवर भारत जिंकला. […]

गाबावर कधीही पराभव न बघितलेल्या कांगारूंना भारतानं चारली धूळ
क्रीडा

गाबावर कधीही पराभव न बघितलेल्या कांगारूंना भारतानं चारली धूळ

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी 328 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सनी दणदणीत पराभव केला. मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक कसोटी सामना जिंकून भारताने कसोटी मालिकाही 2-1 अशा फरकाने खिशात घातली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत […]

स्मिथच्या शतकी पारीच्या जोरावर कांगारुंची पहिल्या डावात त्रिशतकी मजल
क्रीडा

स्मिथच्या शतकी पारीच्या जोरावर कांगारुंची पहिल्या डावात त्रिशतकी मजल

सिडनी : स्टिव्ह स्मिथची शतकी खेळी आणि लाबुशनच्या ९१ धावांच्या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. पदार्पण करणाऱ्या पुलोव्हस्कीनं संयमी ६२ धावांची खेळी केली. रविंद्र जाडेजा-बुमराह यांच्या भेदक माऱ्यापुढे दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढासळली. स्मिथच्या १३० धावांच्या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ३३८ धावा केल्या आहेत. ३३८ धावांचा […]

INDvsAUS : दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन कसोटी मालिकेतून महत्वाचा खेळाडू संघाबाहेर
क्रीडा

INDvsAUS : दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन कसोटी मालिकेतून महत्वाचा खेळाडू संघाबाहेर

सिडनी : तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के एल राहुलला दुखापत झाली आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे के एल राहुल उर्वरित मालिकेला मुकणार आहे. शनिवारी नेट्समध्ये सराव करत असताना त्याला दुखापत झाली आहे. बीसीसीआयने निवेदन प्रसिद्ध करत के एल राहुलच्या दुखापतीसंबंधी माहिती दिली आहे. शनिवारी मेलबर्न क्रिकेट […]

भारताला मोठा झटका; हा खेळाडू कसोटी मालिकेबाहेर
क्रीडा

भारताला मोठा झटका; हा खेळाडू कसोटी मालिकेबाहेर

मेलबर्न : तिसऱ्या कसोटी सामन्यातील भारतीय संघासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या खेळात दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलेला उमेश यादव उर्वरित कसोटी सामन्यांना मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ८वं षटक टाकत असताना उमेशच्या पायाला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. उमेश यादव उर्वरित कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. पहिल्या डावात एकही बळी […]

आतापर्यंत या मराठी खेळाडूंनी केलंय भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व
क्रीडा

आतापर्यंत या मराठी खेळाडूंनी केलंय भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्या म्हणजेच (२६ डिसेंबर)पासून सुरवात होत आहे. ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यापासून आता मराठमोळा अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या सामन्याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला आहे. त्यामुळे भारताचे कसोटीत नेतृत्व करणाऱ्या मराठमोळ्या कर्णधारांच्या यादीत आता रहाणेचा समावेश झाला आहे. […]