INDvsAUS : दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन कसोटी मालिकेतून महत्वाचा खेळाडू संघाबाहेर
क्रीडा

INDvsAUS : दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन कसोटी मालिकेतून महत्वाचा खेळाडू संघाबाहेर

सिडनी : तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के एल राहुलला दुखापत झाली आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे के एल राहुल उर्वरित मालिकेला मुकणार आहे. शनिवारी नेट्समध्ये सराव करत असताना त्याला दुखापत झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बीसीसीआयने निवेदन प्रसिद्ध करत के एल राहुलच्या दुखापतीसंबंधी माहिती दिली आहे. शनिवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर सराव करत असताना के एल राहुलच्या मनगटाला दुखापत झाली आहे. यष्टीरक्षक आणि फलंदाज के एल राहुलला दुखापतीतून पूर्ण बरं होण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ लागणार असल्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

के एल राहुल लवकरच भारतात परतणार असून बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपlस्थित राहणार असल्याचंही बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. सिडनीमध्ये ७ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये एकीकडे रोहित शर्माची उपस्थित भारतीय संघासाठी मोठी जमेची बाजू असताना के एल राहुलची दुखापत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील भारतीय संघाला मोठा धक्का असू शकतो. हनुमा विहारीने तीन डावांमध्ये फक्त ४५ धावा केल्या असल्याने के एल राहुल कमबॅक करत भारतीय संघाची फलंदाजी मजबूत करेल अशी आशा होती.