भारताला मोठा झटका; हा खेळाडू कसोटी मालिकेबाहेर
क्रीडा

भारताला मोठा झटका; हा खेळाडू कसोटी मालिकेबाहेर

मेलबर्न : तिसऱ्या कसोटी सामन्यातील भारतीय संघासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या खेळात दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलेला उमेश यादव उर्वरित कसोटी सामन्यांना मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ८वं षटक टाकत असताना उमेशच्या पायाला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उमेश यादव उर्वरित कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. पहिल्या डावात एकही बळी न घेतलेल्या उमेश यादवने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्सला माघारी धाडलं होतं. उमेश यादवच्या जागेवर भारतीय संघात टी. नटराजनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अनुभवी सलामीवीर रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघातील समावेश निश्चित आहे; परंतु रोहितला खेळवण्यासाठी मयांक अगरवाल किंवा हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला वगळण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे. याचप्रमाणे रोहित नेमका कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार, ही क्रिकेटपटूंची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.