आतापर्यंत या मराठी खेळाडूंनी केलंय भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व
क्रीडा

आतापर्यंत या मराठी खेळाडूंनी केलंय भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्या म्हणजेच (२६ डिसेंबर)पासून सुरवात होत आहे. ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यापासून आता मराठमोळा अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या सामन्याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला आहे. त्यामुळे भारताचे कसोटीत नेतृत्व करणाऱ्या मराठमोळ्या कर्णधारांच्या यादीत आता रहाणेचा समावेश झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आतापर्यंत एकूण भारतीय कसोटी संघाला ३३ जणांनी दिले नेतृत्व
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताला आत्तापर्यंत ३३ कसोटी कर्णधार लाभले आहेत. भारतीय क्रिकेट संघाला महाराष्ट्राने आत्तापर्यंत अनेक दिग्गज कर्णधार दिले आहेत. त्यातील तब्बल १२ कर्णधार महाराष्ट्रातील आहेत, म्हणजेच महाराष्ट्रात जन्म झालेले किंवा महाराष्ट्र व मुंबई संघाकडून खेळले आहेत. विशेष म्हणजे भारतीय संघाला लाभलेले पहिले कसोटी कर्णधार सीके नायडू यांचा जन्मही महाराष्ट्रातील नागपूरचा आहे.

महाराष्ट्रातील कसोटी कर्णधार
सीके नायडू
विजय हजारे
विनू मंकड
पॉली उम्रीगर
हेमू अधिकारी
चंदू बोर्डे
अजित वाडेकर
सुनील गावसकर
दिलीप वेंगसरकर
रवि शास्त्री
सचिन तेंडुलकर
अजिंक्य रहाणे