भाजप करणार काँग्रेसला सहकार्य; उमेदवाराने घेतली माघार
राजकारण

भाजप करणार काँग्रेसला सहकार्य; उमेदवाराने घेतली माघार

नवी दिल्ली : राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपने या निवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. मात्र, महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

वेलमध्ये उतरुन गोंधळ घालणाऱ्या सहा खासदारांचं निलंबन
राजकारण

वेलमध्ये उतरुन गोंधळ घालणाऱ्या सहा खासदारांचं निलंबन

नवी दिल्ली : राज्यसभेत वेलमध्ये उतरुन गोंधळ घालणाऱ्या तृणमूलच्या सहा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आज सकाळी राज्यसभेचे अधिवेशन सुरू झाले तेव्हा या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे सर्व तृणमूल खासदार पेगॅसस वादावर गोंधळ निर्माण करत होते. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांना वारंवार बोलूनही ते शांत न झाल्याने त्यांना पुर्ण दिवसासाठी निलंबित करण्यात […]

राज्यसभेतून तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचे निलंबन
देश बातमी

राज्यसभेतून तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचे निलंबन

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार शांतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शांतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यामुळे शांतनू सेन अधिवेशनाला मुकणार आहेत. शांतनू सेन यांनी गुरुवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव पेगॅसस प्रकरणावर निवेदन देत असताना त्यांच्या हातातून निवेदनपत्र खेचून घेत फाडलं होतं. […]

भाजपकडून पियूष गोयल यांच्यावर महत्वाची जबाबदारी
राजकारण

भाजपकडून पियूष गोयल यांच्यावर महत्वाची जबाबदारी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यावर भारतीय जनता पक्षाने महत्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. त्यांची राज्यसभा सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या जागी त्यांची वर्णी लागली आहे. थावरचंद गहलोत यांची कर्नाटक राज्यपालपदी नियुक्ती केल्यानंतर ही जागा रिक्त होती. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात नुकताच फेरबदल करण्यात आला असून अनेकांची खाती […]

ठरलं ! काँग्रेस या नेत्याला देणार राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद!
राजकारण

ठरलं ! काँग्रेस या नेत्याला देणार राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद!

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यामुळे आता राज्यसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. गुलाम नबी आझाद यांच्याजागी मल्ल्किार्जुन खर्गे यांची वर्णी लागू शकते. काँग्रेसमध्ये तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. मल्ल्किार्जुन खर्गे यांच्याकडे राज्यसभेचे विरोधीपक्ष नेतेपद येऊ शकते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे नुकतेच […]

पक्षीय मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत; रोहित पवारांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक
राजकारण

पक्षीय मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत; रोहित पवारांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

मुंबई : “राज्यसभेत विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब भावूक झाल्याचं पहायला मिळालं. ‘पक्षीय मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत’, या भारतीय राजकारणातील आपल्या पूर्वसूरींनी घालून दिलेला मार्गावरून मोदीजींना चालताना पाहून आनंद वाटला”. असे ट्वीट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावनांचे कौतुक केले आहे. राज्यसभेत विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल बोलताना […]