पुणेकरांसाठी मोठी बातमी : जिल्ह्यातील किल्ले, स्मारके, संग्रहालये होणार खुली
पुणे बातमी

पुणेकरांसाठी मोठी बातमी : जिल्ह्यातील किल्ले, स्मारके, संग्रहालये होणार खुली

पुणे : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी असून जिल्हयातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये  संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन खुली करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये दि. ३१ मार्च २०२० पासून बंद आहेत. पुणे जिल्ह्यास विविध ऐतिहासिक वास्तुचा वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठया प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात. या पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होतो. या पार्श्वभूमीवर जिल्हयातील ही ठिकाणं नागरिकांसाठी खुली करण्याची सातत्याने मागणी केली जात आहे.

दरम्यान, अनलॉक प्रक्रिये अंतर्गत लॉकडाउन शिथील करून विविध बाबींना निर्बंधातून वगळले गेले आहे. तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील स्मारके, संग्रहालये इत्यादी खुले करण्यासंदर्भात ४ जून २०२० रोजी मानक कार्यप्रणाली लागु केलेली आहे. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील प्राप्त अधिकारानुसार जिल्हयातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन खुले करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज दिले आहेत.