नवी दिल्ली : विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारत आधीच पहिल्या क्रमांकावर असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडकडून ३-२ ने पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या स्थानावर घसरला असून भारतापेक्षा फक्त एका गुणाने मागे आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
इंग्लंडचा संघ सध्या पहिल्या क्रमांकावर असून भारतापेक्षा सात गुणांनी पुढे आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये लवकरच पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार असून यावेळी भारताला हे अंतर कमी करण्याची संधी आहे. टी-२० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच न्यूझीलंडविरोधात चांगली कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर के एल राहुल पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली सहाव्या स्थानी कायम आहे.
⬆️ Aaron Finch climbs to No.2
⬆️ Martin Guptill breaks into top 10Gains for batsmen in the latest @MRFWorldwide ICC T20I Player Rankings after the #NZvAUS T20 series 👀
Full list: https://t.co/2ImN92Rkvr pic.twitter.com/k578Z47wzM
— ICC (@ICC) March 10, 2021
टी-२० गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अफगाणिस्तानचा राशीद खान पहिल्या क्रमांकावर आहे, तर मोहम्मद नाही अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल आहे.
🔼 Ashton Agar in top five
🔼 Ish Sodhi, Lakshan Sandakan in top 10The latest @MRFWorldwide ICC T20I Player Rankings for bowling are here!
Full list: https://t.co/JuWITiYKI5 pic.twitter.com/hnqftCB9DZ
— ICC (@ICC) March 10, 2021