लसीकरणात महाराष्ट्र पुन्हा अव्वल! एका दिवसात आठ लाखांचा टप्पा पार
बातमी महाराष्ट्र

लसीकरणात महाराष्ट्र पुन्हा अव्वल! एका दिवसात आठ लाखांचा टप्पा पार

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने लसीकरणाचा उच्चांक कायम राखला आहे. काल (ता. ०४) समोर आलेल्या आकडेवारीनुासर हे स्पष्ट होत आहे की, महाराष्ट्राने लसीकरणाच्या बाबतीत आपलं आघाडीचं स्थान कायम राखलं आहे. राज्यात काल संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ७ लाख ८५ हजार ३११ लाभार्थ्यांनी लस घेतली. ही एका दिवसातली सर्वाधिक आकडेवारी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाच्या बाबतीत राज्य देशात आघाडीवर आहे. एका दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्याचा विक्रम राज्याने अबाधित राखला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली आहे.

व्यास म्हणाले, गेल्या महिन्यात २६ जून रोजी एका दिवसात ७ लाख ३८ हजार ७०४ नागरिकांच्या लसीकरणाची विक्रमी नोंद झाली होती. हा आकडा राज्याने पार केला असून आपला हा विक्रम मोडला आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत तीन कोटी ३८ लाख ५७ हजार ३७२ नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. हा देशातला आत्तापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.