तब्बल चार महिन्यानंतर डिझेल झालं स्वस्त
देश बातमी

तब्बल चार महिन्यानंतर डिझेल झालं स्वस्त

मुंबई : डिझेल दर कपातीने ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंधनाचे दर सलग ३० दिवस स्थिर ठेवले होते. आज डिझेल दर कमी झाल्याने मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९७.२४ रुपये इतका झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.६७ रुपये झाला आहे. चेन्नईत ९४.२० रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.८२ रुपये प्रती लीटर इतका खाली आला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.४६ रुपये झाला असून बंगळुरात डिझेल ९५.०५ रुपये झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज (ता. १८) मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपयांवर कायम आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपयांवर स्थिर आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.४७ रुपये इतका आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी तामिळनाडू राज्य सरकारने पेट्रोलवरील शुल्क ३ रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे आजच्या घडीला चेन्नईत सर्वात कमी दरात पेट्रोल मिळत आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.

मे महिन्यात इंधन दरात प्रचंड वाढ झाली होती. सलग ४२ वेळा झालेल्या दरवाढीने पेट्रोल ११.५२ रुपयांनी महागले होते. तर ४१ वेळा दरवाढीनंतर डिझेलमध्ये ९.०८ रुपयांची वाढ झाली होती. यापूर्वी कंपन्यांनी १५ एप्रिल २०२१ रोजी डिझेल दरात १४ पैशांची कपात केली होती. आज पेट्रोल दर मात्र सलग ३२ व्या दिवशी स्थिर ठेवले आहेत.