नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत गृहमंत्री आणि पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यासंदर्भात शरद पवार यांनी आपल्या ट्विटरवरून माहिती देखील दिली आहे. ही भेट नेमकी कशासाठी घेतली, याविषयी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे देखील उपस्थित होते.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
शरद पवारांनी आपल्या ट्विटमध्ये भेटीचं कारण नमूद केलं असलं, तरी गेल्या काही दिवसांत शरद पवारांनी घेतलेल्या राजकीय भेटीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमागे राजकीय संदर्भ असल्याचे तर्क महाराष्ट्रात काढले जात आहेत. महाराष्ट्रात यावरून राजकीय चर्चांना उधाणही आले आहे.
शरद पवारांनी ट्वीट करून या भेटीविषयी माहिती दिली आहे. सर्वप्रथम मी अमित शाह यांचं देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं. या भेटीदरम्यान, आम्ही देशातील साखर उद्योगाची परिस्थिती आणि साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा केली, असं शरद पवारांनी नमूद केलं आहे.
आम्हाला आशा आहे, की सहकार मंत्री…!
या ट्वीटसोबत शरद पवार यांनी अमित शाह यांना दिलेल्या पत्राची प्रत देखील शेअर केली आहे. आम्ही साखर उद्योगाशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे अमित शाह यांचं लक्ष वेधलं. यामध्ये साखरेला हमीभाव आणि साखर कारखान्यांच्या परिसरातच इथेनॉल मॅनिफॅक्चरिंग युनिट बसवणे या गोष्टींचा समावेश आहे. आम्हाला आशा आहे की या समस्यांमध्ये तातडीने लक्ष घालून सहकार मंत्र त्या सोडवण्यासाठी पावलं उचलतील, असं आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार यांनी नमूद केलं आहे.
Had a brief meeting with Union Co-operation Minister Shri Amit Shah in New Delhi today along with Shri Jaiprakash Dandegaonkar,President of NFCSF (National Federation of Cooperative Sugar Factories Ltd) & Prakash Naiknavre to discuss issues faced by the sugar co-operative sector. pic.twitter.com/4jroaBrsGs
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 3, 2021