राज्यभरात पुढील २ दिवस जोरदार पावसाची शक्यता; पुण्यात हाय अलर्ट
बातमी महाराष्ट्र

राज्यभरात पुढील २ दिवस जोरदार पावसाची शक्यता; पुण्यात हाय अलर्ट

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुढील २४ तासांत पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी आकाशात विजा चमकण्याचं प्रमाण अधिक असणार आहे. त्यामुळे नागरिकांना सर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यापासून पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आजही पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या पुण्याला हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. उद्या राज्यातून जवळपास सर्वच जिल्ह्यांतून पाऊस गायब होण्याची शक्यता आहे. उद्या फक्त नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे.