भाजपला मोठा हादरा; या जिल्ह्यात महाविकासआघाडीची सत्ता
राजकारण

भाजपला मोठा हादरा; या जिल्ह्यात महाविकासआघाडीची सत्ता

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व ११ जागांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपला झटका बसला आहे. कारण, त्यांच्या जागा तीनने कमी झाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसच्या जागेत एक-एकने वाढ झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही एक जागा जिंकली आहे. गेल्यावेळी पेक्षा यावेळी जागा कमी झाल्याने हा भाजपसाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हा परिषदेत एकूण ७ जागा होत्या. मात्र, आता यावेळी त्यांच्या तीन जागा कमी झाल्या असून भाजपला ४ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन-दोन जागांवर विजय मिळवला होता. त्यांनी आपल्या जागेत वाढ करुन प्रत्येकी तीन-तीन जागा जिंकल्या आहेत. यासोबतच गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एकही जागा नव्हती त्यांनी या निवडणुकीत आपलं खातं उघडलं आहे.

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आमदार विजयकुमार गावित यांच्या मुलीने विजय मिळवला आहे. तर त्याचवेळी विजयकुमार गावित यांचा पुतण्या पंकज गावित याचा पराभव झाला आहे. या विजय आणि पराभवामुळे विजयकुमार गावित यांच्यासाठी एका डोळ्यात आसू अन् दुसऱ्यात हासू अशी परिस्थिती झाली आहे. विजयकुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित यांना कोपरली गटातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तेथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सुप्रिया गावित या खासदार हिना गावित यांच्या बहीण आहेत. तर आमदार विजयकुमार गावित यांच्या सुप्रिया गावित या कन्या आहेत. सुप्रिया गावित यांनी शिवसेना उमेदवाराचा 1269 मतांनी पराभव केला आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण लढवली होती आणि मतदारांनी आपल्या पदरात मते टाकली असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया गावित यांनी दिली आहे.

एकूण जागा – 11
भाजप – 4
शिवसेना – 3
काँग्रेस – 3
राष्ट्रवादी – 3