केजरीवाल यांची घोषणा! ‘या’ राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढवणार
राजकारण

केजरीवाल यांची घोषणा! ‘या’ राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने गुजरातमधील विधानसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला असून आप २०२२मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवला यांनी आज (ता. १४) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. विधानसभा निवडवणुकीआगोदर गुजरातमध्ये आपचा प्रसार करण्यासाठी केजरीवाल आज अहमदाबादमध्ये होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत काही जणांनी आपमध्ये प्रवेश केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आपचे उमेदवार सर्व जागा लढवतील. गुजरातमधील नागरिक विचार करत आहेत की, जर दिल्लीमध्ये वीज मोफत दिली जात आहे, तर मग इथं का नाही? तशाप्रकारे इथल्या रूग्णालयांची परिस्थिती देखील मागील ७० वर्षांपासून सुधारलेली नाही. मात्र आता परिस्थिती बदलेल, असे केजरीवाल यांनी बोलून दाखवले. आज गुजरातची जी अवस्था आहे ते भाजप व काँग्रेस सरकारचे कारस्थान आहे. मागील २७ वर्षांमध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे. असं म्हणतात की काँग्रेस भाजपच्या खिशात आहे. गुजरातमधील व्यापारी घाबरलेले आहेत. शिक्षण खराब आहे आणि चांगल्या दर्जाचे रूग्णालयं नाहीत, कोरोनात गुजरात अनाथ झालं होतं. आज गुजरातला एक सक्षम पर्याय मिळाला आहे. गुजरातमध्ये वीज एवढी महाग का आहे? गुजरातमधील रुग्णालयं व शाळा चांगल्या का नाहीत? मात्र हे आता होईल, असा विश्वासही केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेला दिला.

अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या एका नव्या मॉडेलचं आश्वासन दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, दिल्ली मॉडेल वेगळं आहे आणि गुजरातचं एक वेगळं मॉडेल असेल. आप गुजरातच्या लोकांच्या मुद्यांवर राजकारण करेल. २०२२च्या निवडणुकीत येथील जनतेच्या मुद्यांवर निवडणूक लढवली जाईल आणि चेहरा देखील इथलाच असेल. पत्रकार परिषद सुरू असतानाच माजी पत्रकार इसुदान गढवी यांनी आपमध्ये प्रवेश केला. यावर केजरीवाल यांनी इसुदान गुजरातचे केजरीवाल आहेत, असे म्हणून निवडणुकीचा चेहरा जाहीर केला.