रामायणात रावणाची भूमिका अजरामर करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचं निधन
मनोरंजन

रामायणात रावणाची भूमिका अजरामर करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचं निधन

मुंबई : छोट्या पडद्यावरील रामयण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले. वयाच्या ८२ वर्षी त्यांनी आखेरचा श्वास घेतला. काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अरविंद अनेक वर्षांपासून आजारी होते असे सांगितले जाते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ही बातमी त्यांचा भाच्चा कौस्तुभ याने दिली. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. कलाविश्वातील सर्वजण सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण करत आहेत. रामयाणातील रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी ट्वीट करत लिहिले, आध्यात्मिक रुपाने रामावतारचे कारण आणि सांसारिक रुपात एक खूपचं चांगले, धार्मिक, सध्या स्वभावाचे मनुष्य आणि माझा खूप जवळचा मित्र अरविंद त्रिवेदी हे आज आपल्याला सोडून गेले आहेत. अर्थात ते थेट सर्वोच्च निवासस्थानी जातील आणि त्यांना श्री रामाचा सहवास लाभेल.

सुनील लहरी यांनी आरविंद यांचे दोन फोटो शेअर करत ट्वीट केले, अत्यंत दुःखद बातमी आहे की, आमचे लाडके अरविंद भाई (रामायणाचे रावण) आता आपल्यात नाही. त्याच्या आत्म्याला शांती लाभो… माझ्याकडे शब्द नाहीत, मी एक वडील, माझा मार्गदर्शक, हितचिंतक आणि एक सज्जन मनुष्य गमावला आहे.