चित्रा वाघांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; संजय राठोडांवर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
राजकारण

चित्रा वाघांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; संजय राठोडांवर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक : आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असतं. मुख्यमंत्री साहेब खरचं खुर्ची एवढी वाईट आहे का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आम्ही विरोधी पक्षात असलो तरी आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे. 21 दिवस झाले तर एफआयआर देखील झाली नाही. मला विश्वास आहे. असंही वाघ यांनी म्हंटल आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलाच धारेवर धरलं आहे. चित्रा वाघ म्हणल्या की, ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दबाव स्वीकरणारे नाही. सत्तेसाठी तुम्ही झुकणारे नाही आहेत, असा विश्वास आहे. पुन्हा हात जोडून विनंती करत आहे की, या बलात्काऱ्याला हाकलून द्या त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. पूजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड या नावाच्या व्यक्तीचे 45 मिस्ड कॉल होते. हा संजय राठोड कोण आहे याचे उत्तर द्यावे. तसेच 12 ऑडिओ क्लिपबाबात अजून काही स्पष्टता नाही. पुण्यांच्या आयुक्तांकडे एकाही प्रश्नाचे उत्तर नाही. एका बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पुरावे असतानाही संजय राठोडांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार, पोलिस प्रशासन बलात्काऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप एफआयआर देखील दाखल केली नाही.

त्या पुढे म्हणाल्या की, ”पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घ्यावा आणि हा तपास एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्याला सोपवावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे. आमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे पुणे पोलिसांनी दिलेले नाहीत. सगळे पुरावे असतानाही पोलीस आणि सरकार कुणाचा वाट पाहते आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

”जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सुरू आहे. या तीन पक्षातील सरकारची एकी कधीच पाहिली पण आज एका बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी तिन्ही पक्षांच सरकर एकत्र आले आहे. चुकीचा पायंडा महाराष्ट्रात पडत आहे. ती महाराष्ट्राची लेक होती. एवढे सारे पुरावे असताना देखील कारवाई होत नाही, हे तर नामर्द सरकार आहे, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली.