कोरोना आणि माझं कुटुंब; वाचा एका डॉक्टरचा अनुभव
ब्लॉग

कोरोना आणि माझं कुटुंब; वाचा एका डॉक्टरचा अनुभव

1 वर्षापासून कोविड रुग्णालयामध्ये डुटीला आहे. तिथे कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची परिस्थिती आणि नातेवाइकांचे हाल. ही परिस्थिती पाहणे अत्यंत दुःखद क्षण….! कधी मनामध्ये विचार यायचा असे जर आपल्या घरच्या व्यक्तींसोबत झाले तर? आणि तेच झाले. ३ एप्रिलपासून बाबांना प्रचंड ताप होता. मी कोविड ड्युटीवर असताना फोन आला. बाबांना खूप ताप आला आहे असे माझ्या बहिणीने सांगितले. मनामध्ये भीती निर्माण झाली. कारण, रोज रूग्णांना पाहत होते, त्यांचे कोविडमुळे होणारे हाल, भीती हे मनाला वेदना देत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

घरी आयुर्वेद औषधी होत्या तेवढ्या देण्यास सांगितले व आराम करू द्या होईल कमी असे सांगून मी त्यांना धीर दिला. मनामध्ये लगेच आठवण झाली विश्वेश्वर आयुर्वेद चिकित्सालय, नांदेडचे संचालक डॉ. अमृतवाड सरांची. स्वतः मनाला धीर दिला, बाबा पॉजिटिव्ह जरी असले तरी सर आणि आयुर्वेद आहे ! या विचाराने मनाला थोडे बरे वाटले. ३-४ तासाने पुन्हा घरून फोन आई आणि बहीण यांनाही डोके दुखणे आणि किंचित ताप सुरू झाला. आता सर्वांना कोरोना असल्याचे प्राथमिक लक्षणांवरून लक्षात आले होते. घरच्यांना धीर दिला. त्यानंतर अमृतवाड सरांच्या हॉस्पिटला गेले. बाबांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला होता. परंतु सरांनी दोन डोसमध्ये कमी होईल असे सांगितले. सरांनी अँटी कोविड बूस्टर डोस घरी सगळ्यांना सुरू करण्यास आणि आहार पथ्य पाळण्यास सांगितले. त्यानंतर १० दिवसांनी बाबांचे एचआरसीटी आणि रक्ताच्या तपासण्या केल्या. कुठल्याही हॉस्पिटलायझेनशिवाय स्कोर कमी झाला आणि आता ते स्वस्थ आहेत. सरांनी दिलेल्या औषधांमुळे कोविड रुग्णावर लक्षणाची तीव्रता कमी होते हे अनुभवले.

खरं तर कोविड-१९ विरुद्ध लढाई लढताना या आजारापेक्षा ही जास्त आव्हानात्मक असते ते जीवाभावाच्या लोकांपासून दूर राहणं, नियती पदोपदी सत्वपरीक्षा घेत असते, तुमच्या संयम आणि सहनशक्तीचा कस पाहत असते. प्रेम जिव्हाळा तुम्हाला लढण्याचं बळ देत असते. कोरोनाशी भिडताना, त्याचाशी दोन हात करताना, हा काळ खरं तर खूप खडतर होता. मात्र, प्रत्येक चांगली वाईट घटना, प्रसंग अथवा अनुभव माणसाला खूप काही शिकवून जात असतात. जगण्याचं शहाणपण देत असतात. या काळातही खूप काही शिकता आले. काळाच्या पटावरचं माणसाचं अत्यंत सूक्ष्म स्थान, पुरून उरण्याची त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि हा सगळा खटाटोप सार्थ ठरवण्यासाठी लागणारं कोंदण म्हणजे माणुसकीची नाती.

खर तर आयुर्वेदच आहे इम्मुनिटी बूस्टर आणि आयुष्यातील कोविडसारख्या असंख्य जिवाणू – विषाणू वर मात करण्यासाठी. तेव्हा आयुर्वेद चिकित्सा करून स्वस्थ झालेले व्यक्ती स्वतः इतरांना आयुर्वेद औषधी घेऊन स्वस्थ होण्याची संधी द्या. भावना फक्त मनात ठेवू नका. त्यांना मोकळी वाट करून द्या.! व्यक्त व्हा.! अगदी फेसाळणाऱ्या उंच उंच लाटांनी विस्तीर्ण किनाऱ्यालाही कवेत घेणाऱ्या समुद्राप्रमाणे…!!!

लेखक – डॉ.भाग्यश्री वैजनाथराव नरवाडे. ( MD, Ayu.)