आरसीबीचा राजस्थानवर दणदणीत विजय; गुणतालिकेत अव्वल स्थानी
क्रीडा

आरसीबीचा राजस्थानवर दणदणीत विजय; गुणतालिकेत अव्वल स्थानी

मुंबई : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी घोडदौड सुरुच आहे. राजस्थान विरुद्धचा सामना जिंकत बंगळुरुने विजयी चौकार मारला आहे. या सामन्यात राजस्थाननं विजयासाठी दिलेलं १७८ धावांचं लक्ष्य सहज गाठलं. बंगळुरुने १७ व्या षटकातच हे आव्हान पूर्ण केलं. १० गडी राखून आणि २१ चेंडू शिल्लक ठेवून बंगळुरुने हा विजय मिळवला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सामन्यात देवदत्तनं ५२ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. तर विराटने ४७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात सपशेल अपयश आलं. या विजयासह आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. बंगळुरुने यापूर्वी पहिल्या सामन्यात मुंबईला, दुसऱ्या सामन्यात हैद्राबादला आणि तिसऱ्या सामन्यात कोलकाताला पराभूत केलं आहे. या विजयासह बंगळुरुचे गुणतालिकेत ८ गुण झाले आहेत.

बंगळुरुकडून गोलंदाजीत मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी करत ४ षटकात २७ धावा देत ३ गडी बाद केले. तर हर्षल पटेलची गोलंदाजी महागडी ठरली. त्याने चार षटकात ४७ धावा देत ३ गडी बाद केले. सध्या हर्षल पटेल पर्पल कॅपचा मानकरी आहे. त्याने या सामन्यात ३ गडी बाद केल्याने आता त्याचे एकूण १२ गडी झाले आहेत. राजस्थाननं हा सामना गमावल्यानं राजस्थानचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे.