पर्यटन विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन टूर सर्किट; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
बातमी मुंबई

पर्यटन विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन टूर सर्किट; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि.26 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या पर्यटन सर्किटची व्याप्ती वाढवून शालेय स्तरावर देखील सहलींचे आयोजन करण्याचा मानस आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. चेंबूर येथील फाईन आर्ट सोसायटी मध्ये 26 नोव्हेंबर या संविधान दिनाचे औचित्य साधून ‘भारतरत्न डॉ. […]

रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलेय; जितेंद्र आव्हाड संतापले
बातमी मुंबई

रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलेय; जितेंद्र आव्हाड संतापले

ठाणे: योगगुरू रामदेव बाबा यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात महिलांच्या पेहरावाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावरुन सध्या वादंग निर्माण झाला आहे. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

गुड न्यूज! म्हाडा कोकण मंडळाची चार हजार घरांची सोडत; ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीचा समावेश
बातमी मुंबई

गुड न्यूज! म्हाडा कोकण मंडळाची चार हजार घरांची सोडत; ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीचा समावेश

मुंबई महानगरात परवडणारी घरे दुरापास्त झाली असल्याने सर्वसामान्यांचे लक्ष म्हाडा प्राधिकरणाच्या घरांच्या सोडतीकडे लागलेले असते. मुंबई महानगराचा विस्तार होत असल्याने म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत ठाणे, विरार आदी भागात सोडतीच्या रूपात अधिकाधिक घरे उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोकण मंडळामार्फत डिसेंबरअखेरपर्यंत सुमारे चार हजारांहून अधिक घरांची सोडत काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या […]

लोन ॲपवरून वसुलीसाठी बदनामी, मालकाच्या मुलीचे मॉर्फिंग केलेले अश्लिल फोटो व्हायरल
बातमी मुंबई

लोन ॲपवरून वसुलीसाठी बदनामी, मालकाच्या मुलीचे मॉर्फिंग केलेले अश्लिल फोटो व्हायरल

मुंबई पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने अनेक बेकायदा ॲप हटवल्यानंतर लोन ॲपवरून बदनामी करण्याचे प्रकार काही प्रमाणात थांबले होते. मात्र पुन्हा एकदा मालाडच्या कुरारमधून असाच प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने कर्ज फेडले असतानाही पुन्हा एकदा पैशासाठी तगादा लावण्यात आला. त्याने पैसे देण्यास नकार दिला म्हणून या तरुणाचे आणि तो नोकरी करीत असलेल्या मालकाच्या मुलीचे फोटो […]

जगातील सर्वात मोठे विमान मुंबईतील विमानतळावर उतरले; आकार पाहून प्रवासीही अवाक्
बातमी मुंबई

जगातील सर्वात मोठे विमान मुंबईतील विमानतळावर उतरले; आकार पाहून प्रवासीही अवाक्

मुंबई : नागरी उपयोगासाठीचे जगातील सर्वात मोठे विमान मंगळवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. ‘एअरबस बेलुगा’ असं नाव असलेल्या या विमानाला पाहून विमानतळावर उपस्थित प्रवासीही अवाक् झाले. एअरबस कंपनीचे ‘ए३००-६०० एसटी’ हे ‘बेलुगा’ नावे ओळखले जाणारे विमान ५१ टन मालवाहू क्षमतेसह जगातील सर्वात मोठे विमान आहे. वैमानिक खाली व विमानाचा मुख्य भाग त्याच्या […]

राज्याचे धोरण उद्योगस्नेहीच, पण कंपन्यांनी स्थानिकांच्या रोजगार व हिताला प्राधान्य द्यावे- मुख्यमंत्री
बातमी मुंबई

राज्याचे धोरण उद्योगस्नेहीच, पण कंपन्यांनी स्थानिकांच्या रोजगार व हिताला प्राधान्य द्यावे- मुख्यमंत्री

मुंबई, दि. २२ : – आपल्या राज्याचे धोरण उद्योगस्नेहीच आहे. त्यासाठी उद्योगांना गुंतवणूक वाढ, प्रकल्प विस्तारासाठी सहकार्यच केले जाईल. पण उद्योगांनीही स्थानिकांच्या रोजगार संधी आणि हिताला प्राधान्य द्यावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय केमिकल अँण्ड फर्टिलायझर- आर.सी.एफ. कंपनीच्या थळ येथील विस्तारीत प्रकल्पाबाबत आणि डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील स्थानिकांच्या […]

५०० विवाहित मुली राज्यातून गायब; पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा धक्कादायक दावा
बातमी मुंबई

५०० विवाहित मुली राज्यातून गायब; पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा धक्कादायक दावा

मुंबई : लग्न झालेल्या ५०० मुली राज्यातून गायब झाल्याचा धक्कादायक दावा पर्यटनमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी भाजपच्या वतीने मलबार हिल येथे आयोजित जागर सभेत बोलताना केला. मुंबईत तुष्टीकरण आणि एका विशिष्ट समाजाचे लांगुलचालन सुरू आहे. हे असेच चालू राहिले तर मुंबईचा अफगाणिस्तान, काश्मीर व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा देतानाच […]

अहमदनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
बातमी मुंबई

अहमदनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अहमदनगर :- सामाजिक न्याय भवनातून सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत होण्यासाठीच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिप्रेत असा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ, कणखर आणि सदृढ महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दृरदृष्यप्रणालीद्वारे केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री […]

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 4 महिन्यांमध्ये 6 कोटी 40 लाखांची मदत; मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून वैद्यकीय कक्षेची सुरुवात
बातमी मुंबई

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 4 महिन्यांमध्ये 6 कोटी 40 लाखांची मदत; मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून वैद्यकीय कक्षेची सुरुवात

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून गेल्या 4 महिन्यांमध्ये 1 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेमधून 6 कोटी रुपये 40 लाख रुपयांची जवळपास 1200 हून अधिक रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत केली जाते. मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून या वैद्यकीय कक्षेची […]

STच्या ताफ्यात येणार ५ हजार इलेक्ट्रिक आणि २ हजार डिझेल बसगाड्या, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
बातमी मुंबई

STच्या ताफ्यात येणार ५ हजार इलेक्ट्रिक आणि २ हजार डिझेल बसगाड्या, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची ३०२ वी बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनोटिया, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने, कामगार आयुक्त सुरेश जाधव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांचेसह एसटी महामंडळ, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. राज्य परिवहन महामंडळाच्या […]