न्युझीलंडमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन; खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट

न्युझीलंडमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन; खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा निर्णय

जगभरात अद्यापही अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. तर काही देशांमध्ये कोरोना कोरोनाच्या संक्रमण रोखण्यास यश आले आहे. यात सुरवातीला चर्चा होती ती न्यूझीलंडची. न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले होते, मात्र आता पुन्हा एकदा न्यूझीलंडमध्ये नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडले आहेत. नवे रुग्ण सापडताच न्यूझीलंडच्या सरकारनं न्यूझीलंडमधील सर्वात मोठ्या शहरात तीन दिवसांचा लॉकाडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रविवारी एकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोनाचं संक्रमण झाल्याची माहिती समोर आली आहे. नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली. जेसिंडा आर्डन यांनीदेखील आपले अन्य दौरे रद्द केले असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास त्या वेलिंग्टनला परतल्या आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू होणार आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांची कॅबिनेटच्या मंत्र्यांसोबत बैठक पार पडली.

यावेळी बोलताना जेसिंडा आर्डन म्हणाल्या की, “कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनबद्दल जोवर पूर्णपणे माहिती मिळत नाही तोवर आपण सतर्क राहणार आहोत. तसंच कोरोनाचा नवा स्ट्रेन हा यापूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा अधिक संक्रमण करणारा आहे का? याचीही माहिती घेतली जात आहे. तसेच, देशाच्या इतर भागांमध्येही काही प्रतिबंध कायम ठेवले जाणार आहेत. तसंच ऑकलंड व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. असही आर्डन यांनी सांगितले.

दरम्यान, कोविड १९ रेस्पोन्स मिनिस्टर क्रिस हिपकिंस यांनी न्यूझीलंडमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेन बाबत बोलताना म्हणाले की, ”इतर देशांच्या तुलनेत न्यूझीलंडनं यापूर्वी कोरोनाचा सामना उत्तमरित्या केला होता.परंतु आता न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली आहे. अशा परिस्थितीत लोकांना न्यूझीलंडमध्ये पहिले दोन आठवडे क्वारंटाईन व्हावं लागतं. “इतर देशांच्या तुलनेत न्यूझीलंड कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या देशात परसण्यापासून रोखण्यात यशस्वी झाला आहे. परंतु अद्यापही नो रिस्क सारखी कोणतीही स्थिती नाही.