पूजा चव्हाणच्या मृत्युनंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया; ते ऐकल्यावर खूप धक्का बसला…
बातमी मराठवाडा

पूजा चव्हाणच्या मृत्युनंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया; ते ऐकल्यावर खूप धक्का बसला…

बीड : ”माझ्या मुलीचा मृत्यू हा आर्थिक विवंचनेतून झाला आहे. ती गेल्या काही दिवसांपासून तणावात होती आणि त्याचं कारण तिच्यावर असलेलं कर्ज,” अशी प्रतिक्रिया पूजा चव्हाणचं वडिलांनी दिली आहे. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी 23 वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवलं. त्यानंतर पूजाने हे टोकाचं पाऊल का उचललं याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या सर्व घटनाक्रमानंतर यासर्व प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे.

अशातच आता या प्रकरणात आणखी एक नवा ट्वीस्ट आला आहे. पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी एबीपी माझाला आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बातचित करताना त्यांनी असंही ते म्हणाले आहेत. पूजा चव्हाणच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीला पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “खूप वाईट वाटलं. आम्ही तिथे साडेआठ-नऊच्या दरम्यान पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर कळालं की, पूजा आमच्यात नाही. ती बिल्डिंगवरुन पडली आहे आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिथे गेल्यावर कळालं आम्हाला ती आपल्यात नाही. ऐकल्यावर खूप धक्का बसला. काय करावं, काहीचं समजत नव्हतं. तिथे माझ्यासोबत कोणीच नव्हतं. त्यानंतर नातेवाईक आले.”

ते पुढे म्हणाले की, “मला बीपीचा त्रास आहे. त्यामुळे सर्व कामं, व्यवहार पूजा पाहायची. माझ्या मुलीच्या नावावर मी पोल्ट्री साठी कर्ज घेतलं होतं. जवळपास 17 ते 18 लाखांचं कर्ज होतं. लॉकडाऊनमुळे पोल्ट्री बंद झाली होती. त्यानंतर मित्रमंडळी, नातेवाईकांकडून पैसे घेऊन सावरण्याचा प्रयत्न केला. तर बर्डफ्लू आला. त्यामुळे पूजा तणावात होती. एवढे पैसे फेडायचे कसे? हा तिच्यासमोर प्रश्न होता. मी पूजाला त्यावेळी धीर देण्याचा प्रयत्न केला होता. तिला मी सांगितलं होतं, मी आहे पूजा. पण ती म्हणायची, पप्पा मी काय करू? मी आता जाऊन क्लास करुन येते. मला इथे बसून टेन्शन खूप येतंय. पैसे एवढे द्यायचे कसे? बँकेचे मेसेज येत आहेत, हफ्ते भरायला सांगत आहेत.