कोरोना इम्पॅक्ट

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक सुरु; ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. ४) देशातील कोरोना स्थितीसंदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार आहे. विशेष म्हणजे, तीन कृषी कायद्यांच्या मुद्यावरून गेल्या सात दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असतानाच ही सर्वपक्षीय बैठक होत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील सवर्पक्षीय नेत्यांशी आज पंतप्रधान संवाद साधणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या बैठकीत कोरोना लशीच्या योजनेसंदर्भात चर्चा होणार आहे. यावेळी भविष्यातील कोरोना लसीच्या वितरणा संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वीही देशातील कोरोना रुग्णसंखेत होणारी वाढ लक्षात घेता पंतपप्रधानांनी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने बैठक घेतली होती.

या नेत्यांचा असेल समावेश कोरोना लशीसंदर्भातील या सर्वपक्षीय बैठकीत अनेक विरोधी पक्षातील नेते भाग घेण्याची शक्यता आहे. यात – बीजू जनता दलचे चंद्रशेखर साहू, AIMIMचे इम्तियाज जलील, शिवसेनेचे विनायक राऊत, YSRCP से विजयसाई रेड्डी आणि मिथून रेड्डी, जेडीयूचे आरसीपी सिंह, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आजाद, टीएमसीचे सुदीप बंद्योपाध्याय आणि डेरेक ओ’ ब्रायन, AIADMKचे नवनीत कृष्णन, DMKचे TRK बालू आणि तिरुचि शिवा, जेडीएसचे एचडी देवेगौडा, एनसीपीचे शरद पवार, समाजवादीपक्षाचे राम गोपाल यादव, बसपाचे सतीश मिश्रा, राष्ट्रीय जनता जलाचे प्रेम चंद्र गुप्ता, टीडीपीचे जय गल्ला, AAPचे संजय सिंह, TRSचे नाम नागेश्वर राव, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, अकाली दलाचे सुखबीर बादल

दरम्यान, दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक रीत्या वाढत चालली आहे. दिल्लीत गुरुवारी कोरोनामुळे 82 जणांचा मृत्यू – देशाची राजधानी दिल्ली येथे गुरुवारी 3,734 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 82 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दिल्लीत 9,424 जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्ली येथे गुरुवारी सक्रीय रुग्णांची संख्या 30,302 वरून 29,120 वर आली आहे. संपूर्ण देशाचा विचार करता एकूण करोनाबाधितांची संख्या 95 लाखांच्याही पुढे गेली आहे. तर 1.40 लाखांच्या जवळपास लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *