लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट 19 मार्चला पॉझिटिव्ह आला असून 20 मार्चला त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालय़ात दाखल करण्यात आले आहे. एम्सने बुलेटीन काढून बिर्ला यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्सने म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात लॉकडाऊन होऊन वर्षपूर्ती होत असताना कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाली आहे. अनेक राज्यांची परिस्थिती अधिकच बिकट होऊ लागली असून देशातील अनेक भागात लॉकडाऊन लाग्वण्यात आले आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43,846 नवीन रुग्ण सापडले आहेत. यापैकी जवळपास 27 हजार रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

तर आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,15,99,130 झाली आहे. तसेच, कोरोनाच्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सलग ११ व्या दिवशी वाढून 3,09,087 एवढी झाली आहे. तर बरे होण्याचा दर घसरून 95.96 राहिला आहे. राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २४,४९,१४७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ३०० आहे. शनिवारी दिवसभरात १३,५८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत एकूण २२,०३,५५३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९७ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१८ टक्के एवढा आहे.

तर चिंतेची बाब म्हणजे मुंबईत दिवसभरात २९६२ रुग्ण राज्यात सलग दोन दिवस कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या २५ हजारांहून अधिक असल्याची नोंद झाल्याने चिंतेचे वातावरण होते. तर शनिवारी दिवसभरात २७ हजार १२६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ९२ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ९१ हजार ६ इतकी झाली आहे. दरम्यान, मुंबईत शनिवारी २,९६२ रुग्णांची नाेंद झाली असून, ७ मृत्यू झाले.