आता तर मी फाटके कपडेच घालणार, तुम्हाला करायचे ते करा; कटप्पाच्या मुलीला राग अनावर
मनोरंजन

आता तर मी फाटके कपडेच घालणार, तुम्हाला करायचे ते करा; कटप्पाच्या मुलीला राग अनावर

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या फाटक्या जीन्सबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले होते. ‘आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? असे रावत म्हणाले होते. दरम्यान तीरथसिंह रावत यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. महिला नेत्यांसह, कलाकारांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अशातच आता साऊथ इंडस्ट्रीच्या सेलिब्रिटींनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. बाहुबली फेम कटप्पा अर्थात अभिनेता सत्यराज यांची मुलगी दिव्या सत्यराज हिने सुद्धा मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. इतकेच नव्हे तर, आता तर मी फाटके कपडेच घालणार, तुम्हाला करायचे ते करा, असे दिव्याने म्हटले आहे.

दिव्याने तिच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवरून या मुद्द्यावर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘महिलांना त्यांच्या कपड्यांवरून जज करू नका. आम्ही कोणते कपडे घालायचे, कोणते नाही, ते महिलांना शिकवू नका. मी तर फाटकी जीन्सच घालणार. असे दिव्याने तिच्या पोस्टमध्ये म्हंटले आहे. त्याचबरोबर, या पोस्टसोबत तुने रिप्ड जीन्समधील स्वत:चे काही फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. नेते लोक किंवा राजकारणात मोठमोठी स्वप्न पाहणारे कधीही फाटक्या जीन्समधील फोटो शेअर करणार नाहीत. पण मी कोणासाठीही बदलणार नाही. मी जशी आहे, तशीच राहील, असेही तिने म्हटले आहे.

दरम्यान दिव्या सत्यराजचं पूर्वी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिनेही तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याची निंदा केली होती. शिवाय रिप्ड जीन्स घातलेला एक फोटो शेअर केला होता. ‘आमचे कपडे बदलण्याआधी आपले विचार बदला. मी रिप्ड जीन्स घालणार आणि अभिमानाने मिरवणार,’ असे नव्याने तिच्या इन्स्टास्टोरी पोस्टमध्ये लिहिले होते.